तालुका

श्रीक्षेत्र कसबे शिवथर येथील ७५ लक्ष आणि कुंभे शिवथर येथील ५५ लक्ष रुपयांच्या जल जीवन मिशन अंतर्गत कामाचा भूमीपूजन शुभारंभ 

कामाचा भूमीपूजन शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते संपन्न

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

 

महाड : महाड विधानसभा मतदारसंघातील कसबे शिवथर आणि कुंभे शिवथर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने कसबे शिवथर ७५ लक्ष रुपये आणि कुंभे शिवथर करिता ५५ लक्ष मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ दि. ७ रोजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, माजी सभापती सपना ताई मालुसरे, उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, सरपंच शुभांगी भोसले, उपसरपंच किशोर भोसले, विजय साळुंखे कोंडीराम साळुंखे तसेच तीनही शिवथर मधील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित शिवथर विभागातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवथर ही श्री समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पुण्य आणि पावन झालेली भूमी आहे, त्यांचे पावित्र्य राखण्याचे आपण काम करत आहात, त्यामुळे या भागातील जनते करिता जे जे करता येईल तेवढे आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्यासाठी अहोरात्र सदैव मदतीसाठी तत्पर असतो याची आपणास प्रचिती आहेच आणि यापुढेही जे काही विकास का मी असतील किंवा इतर कोणतीही मदत लागली तरी आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव उभे राहू आपण फक्त आमच्या पाठीशी ठाम आहात असेच रहा विकास कामांची जबाबदारी आम्ही स्वीकारलेलीच आहे, म्हणूनच आम्हाला तुम्ही तीन-तीन वेळेला निवडून दिलेले आहे याची जाणीव ठेवून आम्ही आहोत यात चिंता नि काळजी करण्याची काहीच कारण नाही, कार्यक्रमाच्या शेवटी या भागातील ग्रामस्थांनी आणि महिला भगिनींनी आभार विशेष मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!