ब्रेकिंग

मुंबई-गोवा महामार्ग राजेवाडी फाटा येथे पिकअप आणि ॲक्टिवाचा भीषण अपघात

 

प्रदीप सोंडकर / महाड शहर

महाड: 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाटा येथे पिकअप गाडी आणि ॲक्टिवा दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात राजेवाडी येथील रहिवासी हुस्ना अब्दुल अंसारी (वय ५०) आणि अफजल अब्दुल अंसारी (वय २३) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची तीव्रता अत्यंत भीषण होती. अपघातात हुस्ना अंसारी यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून डोक्याला व चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे. तसेच, अफजल अंसारी यांच्या खांद्याचा भाग पूर्णपणे दुखावला जाऊन फ्रॅक्चर झाला आहे. अपघात घडल्यानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी पुढे येत रुग्णवाहिका बोलावली आणि दोन्ही जखमींना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,  सर्व प्रकरणाची पोलिसांकडून तपास सुरु.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!