जिल्हा

महाड औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लावण्यावर शिक्कामोर्तब

रायगड चे पालकमंत्री ना. सामंतांनी मंत्रालयातील बैठकीत दिले आदेश

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार यांचे प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आपण महाड विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने केलेल्या प्रयत्नातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले, असून कारखानदारांच्या शिष्टमंडळासमवेत आज उद्योग मंत्रालयात सर्व संबंधित खात्याच्या उच्च पदस्थ अधिकार्‍यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबत शिक्का मोर्तब करण्यात आले.

महाड उत्पादक संघाच्या वतीने महाड MIDC मध्ये 160 हून अधिक उद्योग कार्यरत असून, आमच्या वसुंधराः पुरस्कार विजेत्या आणि महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन द्वारे चालवल्या जाणाऱ्या पहिल्या IMS प्रमाणित CETP च्या उत्कृष्ट पर्यावरपूरक कामगिरीमुळे महाड औद्योगिक क्षेत्राकडे बरेचसे नवीन उद्योग येत आहेत. मात्र त्याकरीता औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित समस्यांबाबत व पायाभूत सुविधांच्या करिता तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याची मागणी केली होती.

त्यामध्ये प्रामुख्याने महाड एमआयडीसीमध्ये सर्व उद्योगांचे प्रक्रिया केलेले रसायन युक्त सांडपाणी वाहून नेणारी लाईन हि ३० ते ३५ वर्षे जुनी झाल्याने लिक होत असते. वेळोवेळी लाईन लिक झाल्यामुळे, CETP चे कार्य थांबवावे लागते. त्यामुळे कमी क्षमतेच्या Effluent पंपिंगमुळे उद्योगांची उत्पादकता ५०% कमी झाली आहे.एमआयडीसीने २७ किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्याचे काम कारखानदारांनी २५ टक्के निधी देऊन सुरु उदयोगांच्या सहकार्याने हाती घेतले आहे. मात्र नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गेल्या वर्षभरात केवळ ६ किमीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे महाडमधील उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरी या लाईनचे काम 6 महिन्यात पूर्ण व्हावी, महाड औद्योगिक क्षेत्रातील उद्योग वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा आणि अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा यामुळे वारंवार शटडाऊन होते त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी .

MIDC मध्ये सध्या असलेले अंतर्गत मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण RCC मध्ये करावे तसेच कॉलनी एरिया व MIDC मधील अंतर्गत रस्त्यांचे देखील रुंदीकरण व डांबरीकरण करावे.ट्रक आणि मोठ्या अवजड वाहनाची वाहतूक लक्षात घेता, जुन्या MIDC आणि अतिरिक्त MIDC परिसरात दोन स्वतंत्र ट्रक टर्मिनस भूखंड देण्यात यावेत आणि MIDC ने औद्योगिक वाढीसाठी मूलभूत पायाभूत सुविधांप्रमाणेच ट्रक टर्मिनसचा विकास करण्याचे आदेश द्यावेत. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी रस्ता व सध्याच्या MIDC मधील मुख्य रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बारसगाव मार्गे अतिरिक्त MIDC ते भोर रस्त्याची जोडणी करावी. याचबरोबर पुण्याला जाण्याकरिता नवीन शेवते मार्गे नियोजित रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशा मागण्यांचा समावेश होता.

सामंत यांनी आजच्या बैठकीत सांडपाणी वाहून नेणार्‍या पाईन लाईनचे काम, त्यापुढील आंबेत पर्यत जोडणी न झालेले काम, रस्त्याचे काँक्रीटीकरण पुढील पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्याचे तसेच बारस गाव ते आमशेत पर्यतचा पर्यायी रस्ता व पुल शेवते मार्गे पुणे रस्ता आदी कामे मार्गी लावण्याचे आदेश एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांना दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!