जिल्हा
राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विभागातील विविध योजनांच्या खर्चाची आढावा बैठक
राज जाधव – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
ठाणे येथील नियोजन मंडळाच्या सभागृहात राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानियोजन विभागातील विविध योजनांच्या खर्चाची आढावा बैठक संपन्न झाली.
कोकण विभागातील रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पनवेलमहानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह कोकण विभागातील इतर जिल्हयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुस्तक भेटदेवून स्वागत केले.




