CACR आणी युनिसेफ संस्था यांनी आदिवासीवाडी मधील परिवारांना गृहपयोगी वस्तू तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप
स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रायगड वासियांचे जनजीवन विस्कळीत झाले, असून अनेक गावं आणि शहरं पूरग्रस्त झाली होती, निसर्गाचा प्रचंड कोप आणि मन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या आहेत, म्हणून माणुसकीच्या नात्याने दि. २२ जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड, पोलादपूर, तळिये आणि आजूबाजूच्या इतर गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अनेकांच्या घरात, दुकानात वकार्यालयात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले. अनेकांच्या घर, दुकान व कार्यालयातील मौलेवान वस्तू भिजून खराब झाल्या, अश्या पूरग्रस्तांना अनेक संस्थांनी पुढे मदतीचा हात दिला.

आज त्याचा प्रमाणे CACR आणी युनिसेफ संस्था यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महाड तालुक्यातील बिरवाडी काळीज येथील आदिवासीवाडी मधील परिवारांना गृहपयोगी वस्तू तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, या वेळी उपस्थित मान्यवर राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी मदत करणाऱ्या संस्थेचे आभार मानले, आपली केलेली मदत या लोकांसाठी नवीन जीवनाची सुरुवात असेल असे सांगितले, या वेळी तहसीलदार सुरेश काशीद साहेब, मंडळ अधिकारी पवार साहेब, अपर्णा कुलकर्णी, नितीन बनवानी, सुवर्णा घाडगे आणी सहकारी उपस्थित होते.




