महाडचा प्रति “टेंभीनाका” अर्थात “जुनापोस्ट” येथे शिवसेना शाखा नामफलकाचे धुमधडाक्यात अनावरण
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या “गाव तेथे शाखा” या संकल्पनेतून आणि शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या आदेशाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहरातील जुनापोस्ट या शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरण सोमवार दि १८ डिसेंबर 2023 रोजी धूमधडाक्यात करण्यात आले.
ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी जुनापोस्ट येथील रहिवासी कै. नंदकुमार सदाशिव शिंदे यांनी याच जुनापोस्ट नाक्यावर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवेसेना शाखा नामफलकाचे अनावरण केले होते, त्यावेळी जुनापोस्ट नाका लोकांमध्ये महाडचा “टेंभी नाका” म्हणून ओळखला जायचा. त्याचं कै. नंदकुमार शिंदे यांचे चिरंजीव तसेच आमदार भरतशेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक व शिवसेना महाड शहर संघटक ॲड. निखिल नंदकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या जुनापोस्ट शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
सध्या संपूर्ण महाड शहरात शिवसेनेच्या सर्व शाखांचे उदघाट्न तसेच पदाधिकारी नियुक्त्या करण्याचा धडाका सुरू असून येणाऱ्या आगामी काळात नगरपरिषदेवर निश्चितच शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास महाड शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
यावेळी महाड शहरातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



