जिल्हा

भाजी कापण्याच्या चाकूने प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर 

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यात प्रेम प्रकरणावरुन खूनाच्या घटना देखील वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही मागील काही महिन्यांपासून राहत होते, दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला आहे. यशवंत महेश मुंडे ( वय 20) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर वार केल्याचे दिसून आले. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत रहात होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते. त्या दोघांच्या भांडणात प्रेयसीही जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. वाद झाल्याने खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!