तालुका

१७ ऑगस्टला आदित्य ठाकरे यांची महाड मध्ये निष्ठा यात्रा

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

निष्ठावंत शिवसैनिक शक्ती प्रदर्शन करणार, रायगड मधील तीन ही आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी करीत संघटने मध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम केले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वा खाली संपुर्ण महाराष्ट्रात ही दुफळी निर्माण केली गेली, परंतु निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे सोबत आहे हे दाखवून देण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा राज्यात सुरु आहे.

ही यात्रा १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता छ. शिवाजी महाराज चौक येथे येणार आहे, यावेळी निष्ठावंत शिवसैनिक आपले शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद काय आहे हे बंडखोरांना दाखवून देणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनीमहाड येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जि.प. सदस्य बाळकृष्ण राऊळ, तालुका प्रमुख फळसकर, अमित मोरे, पदमाकर मोरे, रघुवीर देशमुख, शहर प्रमुख चेतन पोटफोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नवगणे यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचा खरपूस समाचार घेतला, पालकमंत्री हटाव ही मोहीम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केल्या जाणार्‍या बंडखोरीचा एक भाग होता. शिवसेना आमची आहे अशा वल्गना गावा गावात जाऊन करणारे पक्षावरच घाळाघालण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप केला. बंडखोरी नाही हा उठाव आहे असे बंडखोर आमदार सांगत आहेत मात्र शिवसेनेला खिळखिळी करण्यासाठी आर्थिक व्यवहारातून केलेली ही बंडखोरीच असल्याचे नवगणे यांनी स्पष्ट करीत या बंडखोर आमदारांना निष्ठावंत शिवसैनिक धडा शिकवणार भविष्यात हे बंडखोर कधीही आमदार होणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

गेली ३ ते ४ वर्षे यांच्या सोबत काम करीत असताना यांचे धंदे आपण पाहीले आहेत. महाड एमआयडीसी व पास्को कंपनीत आर्थिकसोर्स निर्माण करण्यासाठी यांनी कुणाशीही मैत्री केली शिवसैनिक मेला तरी त्यांना काहीही फरक पडत नव्हता. कंपन्यांमध्ये तडजोडी करायचे व्यवहार यांनी केले. आत्ता पर्यत स्थानिकांना किती नोकर्‍या व न्याय दिला हे बंडखोरांनी जाहीर करावे असे आव्हान देतएकीकडे पालकमंत्री हटाव मोहीम करायची आणि दुसरीकडे पास्को कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेण्यासाठी सुतारवाडी येथे दोन दोन दिवस राहायचे, जे बाळासाहेबांचे झाले नहीत ते सर्व सामान्यांचे कसे होतील असा सवाल नवगणे यांनी केला, प्रत्येक माणसाला पैसेदेऊन गोरेगांवची सभा केली. जलजीवन योजग मंजूर करून घरा घरात पाणी योजना आणल्या असे हे सांगत आहेत मात्र या योजनेशी आमदार मंत्र्यांचा काही संबंध नाही या केंद्र शासनाच्या योजना आहेत, दम असेल तर योजना थांबवून दाखवा असे खुले आव्हान नवगणे यांनी दिले. १७ ऑगस्ट आदित्य ठाकरे यांचे समवेत शिवसेना नेते अनंत गिते, आदेश बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, बबन पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत असे नवगणे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!