शहर

वयाच्या ८३ व्या वर्षीही माजी तहसीलदार अनंत टमके यांची धडाडीने समाजसेवा

शिंपी समाज व ज्येष्ठ नागरिक संघात भूषवत आहेत महत्त्वपूर्ण पदे

 

महाड प्रतिनिधी – प्रदीप सोंडकर

महाड : प्रशासकीय सेवेत असताना आपल्या कार्यक्षमतेने आणि उत्कृष्ट कारभाराने ठसा उमटवणारे महाडचे माजी तहसीलदार अनंत टमके शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही अविरत समाजकारणात सक्रिय आहेत. आज वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचा सामाजिक क्षेत्रातील उत्साह, अभ्यास आणि तळमळ वाखाणण्याजोगी असून विविध संस्थांच्या माध्यमातून ते समाजाला मार्गदर्शन करत आहेत.

प्रशासकीय अनुभवाचा वापर करत टमके साहेब यांनी ओबीसी घटकांच्या विविध प्रश्नांपासून ते अनेक सामाजिक विषयांपर्यंत सखोल अभ्यास करून समाजबांधवांना वेळोवेळी दिशा देण्याचे काम केले आहे. शिंपी समाजाचे ‘महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष’ म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले असून, समाजात त्यांची ओळख एक खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.

सध्या ते ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चे सल्लागार तसेच ‘रायगड जिल्हा शिंपी समाज कार्यकारिणी’चे विश्वस्त म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा सामाजिक क्षेत्रातील सहभाग, दांडगा अनुभव आणि मार्गदर्शक भूमिका समाजबांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या निरंतर समाजसेवेबद्दल आणि योगदानाबद्दल महाड परिसरासह सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि सन्मानाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!