मुंबई सीएसटी येथून ‘श्रीराम जगन्नाथ पुरी दर्शन यात्रा’ रवाना; महाडच्या भाविकांचा मोठा सहभाग

प्रदीप सोंडकर महाड शहर
महाड : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून विशेष आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीराम जगन्नाथ पुरी दर्शन यात्रे’साठी महाड शहरासह नवे नगर परिसरातून भाविक मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या आध्यात्मिक यात्रेनिमित्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
या धार्मिक यात्रेसाठी महाड शहरातून, विशेषतः नवे नगर भागातील भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले असून, मुंबई सीएसटी स्थानकावरून या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे.
या यात्रेत महाडचे माजी नगराध्यक्ष सुरेश मोरे यांच्यासह महाडच्या नगराध्यक्षा कविस्कर यांच्या पत्नी आणि इतर शहरातील अनेक प्रमुख नागरिक व महिला भाविक सहभागी झाले आहेत.
संपूर्ण यात्रेचे सुटसुटीत व नेटके नियोजन ह.भ.प. श्री प्रसाद पानसरे महाराज यांनी केले आहे.
प्रवासादरम्यान भाविकांची राहण्याची, खाण्यापिण्याची आणि दर्शनाची सर्व प्रकारची योग्य काळजी घेण्यात आली असून सर्व भाविक अत्यंत आनंदी वातावरणात जगन्नाथ पुरी दर्शनासाठी रवाना झाले आहेत.



