स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिना निमित्त सोमवार, दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 09.05 वाजता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.facebook.com/collector.raigad या फेसबुक पेजवरूनही करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा, अशी सूचना शासनाकडून करण्यात आली आहे.
नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



