जिल्हा

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागवले

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग 

रायगड: विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिक त्यांचे पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ठ कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील. अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना यामध्ये अशा कार्याबदृल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे. अर्ज व कागदपत्रे 22 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत.

पुढील गौरव पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणा-यांना पुरस्कार, शैक्षणीक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार असे आहेत.

सदरच्या गौरव पुरस्कारांसाठी पात्रताधारकांनी खालील प्रमाणे अर्ज व कागदपत्रे आवश्यक आहे.

1. पुरस्कारासाठी संबंधिताचा वैयक्त‍िक अर्ज अनिवार्य असून अर्जा सोबत

2. फॉर्म डी. डी. 40 (कार्यालयात उपलब्ध आहे-अनिवार्य),

3.ओळखपत्राची दोन्ही बाजूची छायांकीत प्रत,

4.उत्कृष्ट कामगिरीबाबतच्या प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत,

5. वर्तमानपत्रातील जाहिरातीचे कात्रण,

6. 10 वी, 12 वी च्या प्रमाणपत्राची /गुणपत्रीकेची साक्षांकीत प्रत,

7.डिस्चार्ज पुस्तकामध्ये कुटूंबाची नावे असलेल्या पानाची छायांकीत प्रत,

8.राष्ट्रीयकृत बँक पासबुकाची छायांकीत प्रत.

तरी या संधीचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिक, विधवांनी, पाल्यांनी घ्यावा असे आवाहन ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!