जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा
विशाल मोहिते : उपसंपादक कोकण विभाग
रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रायगड-अलिबाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार आपघात प्रकरणे, 138 एन.आय. अॅक्ट खालील प्रकरणे, दिवाणी दावे व अपिले, सहकार न्यायालयातील प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयातील प्रकरणे, नगरपालीका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांचेकडिल थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्याने लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेली कोर्ट फीस परत मिळते. त्यामुळे 9 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्याया राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड-अलिबाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे.



