ब्रेकिंग

बिपरजॉय गुजरातला धडकलं / लँडफॉलनंतर द्वारका आणि कच्छमध्ये विध्वंस सुरू, 240 गावांतील वीज पुरवठा खंडीत

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या 74 हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय झालेलं असेल, हे सकाळीच स्पष्ट होईल. दरम्यान पुण्यातील NDRF चं पथक द्वारकेमध्ये मदतकार्य करत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून आठ किनारी जिल्ह्यांमधून यापूर्वीच 74 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. चक्रीवादळाचा मोठा तडाखा कच्छच्या किनाऱ्याला तसेच देवभूमी द्वारकेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्छ किनारपट्टीतील 240 गावांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. शिवाय दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूकदेखील बंद करण्य़ात आली आहे दरम्यान, गुजरातमध्ये NDRFच्या 18 तुकड्या तैनात असून लष्कर, नौदल आणि वायुदलाचीही मदत घेण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!