जिल्हा

थोर समाजसेवक संजय अप्पा ढवले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


डॉ
. अनंत खराडे – मुख्य संपादक

रायगड :- राज्य तसेच देशातील नामांकित संस्थांपैक्की  अविष्कार सोसियल अँड एज्युकेशन फौंडेशन हे विशेष गणले जाते. तर याप्रतिष्ठित संघटना कडून राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्कार सन्मान हे गेली दीड दशक पासून दिमाखाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाजावणारे यांना देत आले आहे. तर या वर्षीही ही प्रथा ठेवून 2022 करिता थोर समाजसेवक तथा माणगांव तालुका भाजपपक्षाचे विध्यमान अध्यक्ष असलेल्या संजय अप्पा ढवले यांना रविवारी दि. 25 सप्टेंबर रोजी तालुकायातील श्रीवर्धन शहर येते आयोजित कोकण स्थरिय कार्यक्रम दरम्यान शानदार रीतीने व यथोचित गौरवाने रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाचे विध्यमान आमदार अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अमूल्य हसतेनी सन्मान प्रमाणपत्र व मान चिन्ह देऊन प्रधान करण्यात आला. या वेळी सदर संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या पत्रकार संजय पवार, कोकण पदाधीकारी व रायगड जिल्हा कार्यक्रम आयोजक असा अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यादरम्यान सत्कारर्मुर्थी संजय अप्पा ढवळे यांनाही प्रतिष्ठित सन्मान मिळाल्याने सर्व स्थऱ्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!