मनविसेचे मुरुड तालुका पदाधिकारी जाहीर
महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेच्या मुरुड तालुका अध्यक्षपदी युवराज भगत तर मुरुड शहर अध्यक्षपदी अथर्व खोत यांची नियुक्ती
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
मुरुड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमितजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 सप्टेंबर रोजी कर्जत येथे मुरुड तालुक्याच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी नेमणूक व सत्कार सभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेच्या मुरुड तालुका अध्यक्षपदी युवराज भगत, मुरुड शहर अध्यक्षपदी अथर्व खोत, उपाध्यक्ष पदी अंकितगुरव आणि प्रवेश पालशेतकर असे तालुका व शहर सर्व पदांची नेमणूक करून नियुक्ती या वेळी करण्यात आली.
नवीन नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत फेटे बांधून करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्या देण्यात आल्या, सदर सर्व कार्यक्रम मा. जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला, यावेळी आजी माझी पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




