तालुका

श्रीवर्धन येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

श्रीवर्धन नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यतिथी साजरी

शिवराज संदीप चाफेकर यांची श्रीवर्धन सलून संघटना अध्यक्षपदी निवड

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

श्रीवर्धन : नाभिक समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी अनंत चाफेकर यांच्या निवासस्थानी मोठया उस्तवात साजरी करण्यात आली. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्रीवर्धन शहरातील नाभिक संघात श्री संत सेना महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन पूजन करण्यात आले, संत सेना महाराज पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात येत आहे.

श्रीवर्धन नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यतिथी साजरी करण्यात आली, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, पोथी पूजन देखील करण्यात आले, अल्पपोहार व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनचे यावेळी गुणगौरव करून, शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

उजवीकडून श्रीफळ व पुष्पगुच्छ स्वीकारताना शिवराज चाफेकर

शिवराज संदीप चाफेकर यांची श्रीवर्धन सलून संघटना अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल अध्यक्ष विलास केशव कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सेना महाराज पुण्यतिथी च्या योगा–योगाने श्रीवर्धन नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार अरुण केशव कदम यांनी 71व्या वर्षात पदार्पण केले असून सलून संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवराज चाफेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!