तालुका

श्रावण मास निम्मित कोपरान लिमिटेड कंपनी मध्ये श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

स्वप्नील धवन – उपसंपादक महाराष्ट्र राज्य

महाड : महाड तालुक्यातील बिरवाडी एम.आय. डी.सी. मधील कोपरान लिमिटेड कंपनी मध्ये सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यामध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते, अतिशय नयनरम्य वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा संप्पन झाली.

या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, श्री सत्यनारायण महापूजा आटपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनतर काळीश्री भजनी मंडळ यांनी भजन सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या प्रसंगी कोपरान लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर माननीय कपिल मोहन साहेब व समाननीय कोटिवाल साहेब, पर्सनल मॅनेजर मणिलाल पाटील साहेब, प्रोडक्शन जनरल मॅनेजर कवडे, इतर डिपार्टमेंट मॅनेजर, अधिकारी, राजिप सदस्य मनोज काळीजकर, भारतीय कामगार सेनेचे महाड युनिटचे चिटणीस श्री उदय शेट्टे, भारतीय कामगार सेनेचे महाड युनिट सहचिटणीस संतोषजी कदम, अनिल येरुणकर, मा. सरपंच प्रमोद म्हामुणकर, मा. सरपंच शिवाजी कदम, भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष समाननीय गिरीश ( बाळा ) देवरुखकर, भारतीय कामगार सेनेचे सर्व सदस्य, कामगार प्रतिनिधी, भारतीय कामगार सेना मा. अध्यक्ष महेंद्र मालुसरे, सर्व समाननीय अधिकारी आणी समाननीय महिला कर्मचारी आणी सर्व समाननीय ऑपरेटर, सर्व जनरल मॅनेजर तसेच सर्व आजी माजी  लीडर आणी कंपनी प्रशासन आणी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!