जिल्हा

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद

प्रतापगड फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 

समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर

पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पार फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट एक दिवस बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी इथली वाहतूक बुधवारी 4 जानेवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान बंद राहिल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खराब झाला होता. रस्ते, घाट, पूल, शेती, घरे, जनावरं यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच नदीपात्रातून, ओढ्यांच्या पात्रांतून मोठ्या प्रमाणात दगड-माती रस्त्यावर येऊन जागोजागी मोऱ्यांची आणि रस्त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. रस्ता वाहून जाणे, पुल वाहून जाणे अशाप्रकारचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे अतिवृष्टीमुळे दूरवस्था झालेल्या रस्त्याचं काम आज दिवसभरात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!