जिल्हा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

लातूर: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंब व  सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सदर संस्थेचे संस्थापक व काल परिवर्तन यावृत्तपत्राचे संपादक श्री संजय राजुळे व त्यांच्या टीमने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची भेट घेऊन निमंत्रण पत्र दिले आहे.

सप्तफेरे वधू–वर सूचक आयोजित सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२१ साठी निवड समितीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार सोहळा दि. ३० डिसेंबर,२०२१ रोजी अष्टविनायक मंदिर हॉल, नारायण नगर, लातूर येथे सायंकाळी ६.०० वाजता दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून हा बहुमान स्विकारावा असेसप्तफेरे वधू–वर सूचक केंद्राचे संस्थापक श्री संजय राजुळे यांनी आवाहन केले आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्रातील, संपादक, पत्रकार, समाजसेवक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक व हित चिंतकांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!