जिल्हा

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणारे काम करण्यासाठी कटीबद्ध - आदिती तटकरे

 

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड: दि.15 शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्य करीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77  व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा. अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.  राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

आज राज्यातील शेतकरी-कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिले जात आहे. विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करुन मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातूनही बाब ठळकपणे अधोरेखीत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!