जिल्हा

03 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिम

 

सतिश मेहता – तालुका प्रतिनिधी महाड 

रायगड : जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवार दि. 03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या माहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे. 0 ते 05 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहिम कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. (प्रभारी) सत्यजीत बडे यांनी केले आहे.

रायगड जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 73 हजार 854 त्याकरीता ग्रामीण भागात 2 हजार 109 बुथ व शहरी भागात 143 बुथ असे एकूण 2 हजार 252 बुथवर पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वेस्थानक व ग्रामीण भागात 137 ट्रान्झीट टीम व शहरी भागात 330 अश्या एकुण 467 ट्रान्झीट टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 142 मोबईल टीम व शहरी भागात 12 अश्या एकुण 154 मोबईल टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरीता 5 हजार 67 आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खाजगी संस्थाचा देखील यामध्ये सहभाग करुन घेण्यात आला आहे. तसेच लसीकरणाच्या दिवशी एकुण 450 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, व नंतर आय.पी.पी.आय करीता एकुण 1 हजार 143 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!