प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता. सचिव नसीर तगाले महात्मा गांधी रत्न अवॉर्डने सन्मानित
मितेश महाले – सहसंपादक
नांदेड : मुंबईच्या मेहर हॉलमध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण द्वारा महात्मा गांधी रत्न अवार्ड २०२१ चे शानदार आयोजन करण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागातील आज की न्युजचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवटतालुका सचिव नसीर तगाले यांना मुंबई येथे “महात्मा गांधीरत्न अवार्ड २०२१” ने सन्मानित करण्यात आले.
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेडच्या वतीने नसीर तगाले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संघटक विशाल पवार, किनवट तालुका अध्यक्षआशिष शेळके, तालुका उपाध्यक्ष शेख आतिफ, सहसचिव प्रणय कोवे, तालुका संघटक राज माहुरकर, प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम, सदस्य विशाल गिमेकर, रमेश परचाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीदिनी मुंबईमध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी महात्मा गांधी रत्न अवार्ड २०२१ चे शानदार आयोजन केलेहोते. डॉक्टर डॉ भारती लव्हेकर, वर्सोवा अंधेरी मुंबईच्या आमदार आणि गजेंद्र चौहान यांच्या हस्ते आवार्ड प्रदान करण्यात आले.
यात महात्मा गांधी रत्न अवार्ड २०२१ सुनील बोंडे एसीपी, अनु मलिक, मधुश्री, गजेंद्र चौहान, डायरेक्टर मेहुल कुमार, प्रेमा किरण, सुनील पाल, एहसान कुरैशी, बीएन तिवारी, सिकन्दर खान, अरुण उग्रेजा, ज़ुबैर अली खान, ॲक्टर शबनम खान, मुनीश खान, गीतकारसुधाकर शर्मा, पारस अरुण बख्शी, दादा साहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाल्कर, डॉ योगेश लखानी, गणेश पचाने, आदत एमपीडायरेक्टर साउथ सिनेमा, वीआईपी कॉमेडियन, अली खान, एकता जैन, बबलू एक्स पोकल्स, आर राजपाल बेस्ट पब्लिसिटी डिज़ाइनर तसेच अनेक दिग्गजना सन्मानित करण्यात आले. नसीर तगाले यांना २०२१ चा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
