तालुका

महाड-पोलादपूर मधील व्यापाऱ्यांकडून दुबार सेस वसूल केला जाणार नाही – आमदार भरतशेठ गोगावले

प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड आणि पोलादपूर मधील व्यापाऱ्यांकडून बाजार समिती मार्फत दुबार सेस वसूल केला जाणार नाही माननीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या मागणी नुसार झालेल्या बैठकीत मंत्री पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाजार समितीने एकाच मालावर दुबार सेस  घेऊ नये असा निकाल व्यापारी वर्गाच्या बाजूने मंत्री महोदयांनी आज दिला. व्यापारी वर्गाची मागणी अशी होती की आम्ही जर वाशी मार्केट मध्ये माल खरेदी करताना या मालाचा शेस भरत असताना देखील या ठिकाणी बाजार समिती कडून त्याच मालावर पुन्हा शेष घेतला जात होता, व्यापारी वर्गाची मागणी अशी होती कीआमच्या सदर मालावरती शेष हा एकाच ठिकाणी घेण्यात यावा एकाच मालावर दोन वेळा शेष कसा काय घेतला जातो व्यापारी वर्गाचीमागणी ही रास्त असल्यामुळे सदर निकाल हा व्यापाऱ्यांच्याच बाजूने देण्यात आला.

या वेळी संपूर्ण व्यापारी वर्गाने मंत्रालयाच्या गेटवरतीच मानले आभार, कारण आमदार भरतशेठ गोगावले यांनी वेळोवेळी मंत्रालयात संबंधित विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आज झालेल्या बैठकीत मंत्री महोदय समोर कडून दुबार सेस कशा प्रकारे वसूल केला जातो याची भक्कम बाजू मांडल्यामुळे च आज व्यापारी वर्गाचा विजय झाला आहे, असे उपस्थित व्यापारी वर्गाच्या प्रतिनिधींनीयांनी सांगितले, त्यामुळे आमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत असे व्यापारी वर्गाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!