जिल्हा
महाड येथील लोकन्यायालयात ७७ फौजदारी, 12 दिवाणी प्रकरणे निकाल
पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गोगावले भावकीतील वादही संपुष्टात
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड दि. 11 महाड येथे आज आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये ७७ फौजदारी आणि १२ दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गोगावले भावकी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला वादही या महा लोकअदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आला.
महाड न्यायालयात या महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महाड कामगार न्यायायलाचे वरिष्ठ स्तर न्यायाधिश श्री. उन्हाळे आण महाडचे दिवाणी न्यायाधिश श्री. शेख यांनी यावेळेस काम पाहिले.
सन २०१८ पासून पिंपळवाडी ग्रामपंचायत आणि गावातील गोगावले भावकी यांच्यामध्ये गावातील स्मशानभूमीवरुन वाद सुरु होता. न्या. उन्हाळे यानी दोन्ही बाजूंशी समन्वय साधून या लोक अदालतीमध्ये हा वाद सपुष्टात आणला. यामुळे दोन्ही बाजूंनी आमेद व्यक्त करण्यात आला.



