जिल्हा

श्री कडेश्वरी माता प्रसन्न महिला विकास ट्रस्ट यांच्या वतीने येऊर ठाणे येथे वृद्धाश्रम भूमिपूजन सोहळा संपन्न

 

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

श्री कडेश्वरी माता प्रसन्न महिला विकास ट्रस्ट संचालित कै. दगडू शंकर महाडीक प्रेरीत यांचा सहयोगाने माझे आई – बाबा वृद्धाश्रमाचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. 26 जून रोजी येऊर ठाणे येथे पार पडला.

या वेळी कडेश्वरी महिला विकास ट्रस्ट अध्यक्षा डॉ. सायली दळवी यांच्या उपस्थिती मध्ये, जागेचे मालक बाबू चौधरी आणि ग. भा. प्रमिला दगडू महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रम पार पडला. या वेळी वरिष्ठ मान्यवर, संतोश तांबे, नारायण सालेकर, सुधीर खानोलकर, विलास साठम, राकेश महाडिक, रंजीत साळुंके, एवण डिसोझा, वसंत राणे, सागर सावंत, जर्नारधन पारधी, शशांक बानखिळे, पूर्णांनंद भावसार, दर्वेश महाडिक, इस्माईल शेख, कडेश्वरी महिला विकास ट्रस्ट चा सर्व महिला, वृद्धाश्रम कमेटी उपस्थित होते.

ए. एस. मराठी न्यूज या वाहिनीचे प्रतिनिधी बंटी पाटील यांचे यावेळी अध्यक्षा डॉ. सायली दळवी यांनी विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!