देश-विदेश

चीनमध्ये एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 3.7 कोटी रुग्ण, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य 

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने या आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून एकाच दिवसात 3.7 कोटी रुग्णांची भर पडल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.

दिवसेंदिवस आवळतच चालला असून एकाच दिवसात 3.7 कोटी कोरोना रुग्णांची भर पडल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे. ही रुग्णसंख्या जगभरातीस सर्वात मोठी असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 24.8 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के इतकी भरते. महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांमध्येचं कोरोनाच्या एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीत हा डेटा शेअर करण्यात आला, असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!