कुंभारवाडा येथील प्राणी मित्रांनी अजगराला जंगलात जिवंत सोडून दिले जीवदान
कुंभारवाडा येथील प्राणी मित्रांनी अजगराला जंगलात जिवंत सोडून दिले जीवदान
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
बिरवाडी: 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास कुंभारवाडा – बौद्धवाडी लोकवस्ती जवळ आठ ते नऊ फुटाचा भला मोठा अजगर आढळला, भला मोठा अजगर लोकवस्ती असलेल्या घराशेजारी आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भला मोठा अजगर मानवी वस्तीमध्ये कोंबड्या खाण्यासाठीच आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कुंभारवाडा येथील प्राणीमित्र मिलिंद मोरे, यश मेश्राम, रोहन गायकवाड यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या भल्या मोठ्या अजगराला जिवंत पकडले. भल्या मोठ्या अजगराला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. काही वेळाने महाड वन विभाग यांच्याशी संपर्क केला असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेल्या जिवंत अजगराला जंगलात सोडण्यास सांगितले. थोड्याच वेळानंतर प्राणी मित्र मिलिंद मोरे, यश मेश्राम, रोहन गायकवाड यांनी या अजगराला दूर जंगलात जिवंत सुखरूप सोडून दिले. कुंभारवाडा बौद्धवाडी येथील प्राणी मित्रांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे बिरवाडी विभागातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.



