महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर

स्वप्नील ढवण - उपसंपादक

देगलूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारिणी सुनील मदनुरे देगलूर तालुका अध्यक्ष, चंद्रकांत गज्जलवार  तालुका उपाध्यक्ष, संतोष मंनधरणे तालुका सचिव, ईश्वर देशमुख तालुका कोषाध्यक्ष, मनोज बिरादार तालुका संघटक, एकनाथ गाडीवान तालुका सह सचिव, दादाराव बेळीकर तालुका सह–कोषाध्यक्ष, उमाकांत कोकणे देगलूर शहर अध्यक्ष, मलिकार्जुन कडलवार शहर उपाध्यक्ष, अमित पाटील शहर सचिव आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. येत्या काळात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याच्या वतीने पत्रकार व त्यांचे कुटुंब, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये खूप कार्य करणार असल्याचे देगलूरतालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांनी यावेळी सांगितले. देगलूर तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांनी पुढील कार्यासाठी   शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!