ब्रेकिंग

किरीट सोमय्या यांनी महाडच्या पत्रकारांना केले अपमानित

पत्रकारांनी किरीट सोमय्या यांचा केला जाहीर निषेध

अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड

दि. २६ मार्च २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे दापोली प्रवासा दरम्यान महाड येथे दुपारी १:०० वाजता मोटेल विसावा येथे जेवणास थांबले असता, त्यावेळी महाड येथील सर्व पत्रकार उपस्थित होते, पत्रकारांनी किरीट सोमय्या यांना कोणतेही प्रश्न न विचारताच यांनी स्थानिक पत्रकार यांनी बाहेर जाणे व फक्त मुंबईतील पत्रकारांनी आत यावे नाहीतर मी बाहेर जातो अशा प्रकारचा महाड मधील सर्व पत्रकारांना शब्दोच्चार करुन अपमानित केले आहे, त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाड मार्फत कोकण विभागीय उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे व महाड तालुकामधील कार्यकारिणी यांनी किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाड तालुका अध्यक्ष किशोर किर्वे यांनी सोमय्या यांना महाड येथील स्थानिक पत्रकारांची जाहीर माफी मागण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!