राजमाता जिजाऊंची ४२४ वी जयंती पाचाड येथे उत्साहात संपन्न
राजमाता जिजाऊंची ४२४ वी जयंती पाचाड येथे उत्साहात संपन्न
आमदार भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री अदिती तटकरे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना केले अभिवादन
छत्रपतींचा रायगड किल्ला आणि माँसाहेब जिजाऊ यांचे समाधीस्थळ पाचाड हि आमची बांधिलकी:- आमदार भरतशेठ गोगावले

समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
रायगड : स्वराज्यजननी, स्वराज्य प्रेरक अशी माता ज्या मातेने श्री छत्रपती शिवरायांसारखा शूरवीर पुत्र घडविला त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांचा 424 वी जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. राजमाता जिजाऊंच्या जन्म गावी बुलढाणा मधील सिंदखेड राजा येथे आज राजमातांना मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी शिवभक्त आणि राजकीय नेते उपस्थित असतात, मात्र काही वर्षांपासून राजमाता जिजाऊंची जयंती किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी साजरी करण्यात येत असून या तारखेप्रमाणे साजरी होणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जयंतीला महाड पोलादपूर माणगाव चे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले हे आवर्जून उपस्थित राहत असतात, आज राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी राजमात जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी आमदार भरतशेट गोगावले, माजी मंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ट नेते हनुमंत जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राऊळ, माजी जिल्हा परिषद मनोज काळीजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे, माजी उपसभापती चंद्रकात बुवा जाधव, ग्रामपंचायत सरपंच सिमाताई बेंदुकडे, उपसरपंच राकेश बामणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोळत असताना आमदार भरतशेट यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२४ वी जयंती आपण पाचाड येथे साजरी करत असलो तरी माँ साहेबांच्या जन्म गावी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र गेळ्या काही वर्षांपासून आपण माँ साहेबां ची जयंती आपण पाचाडला माँ साहेब जिजाऊंच्या समाधी स्थलावर साजरी करत आहोत याचे समाधान वाटत असून छत्रपतींचा किल्ले रायगड आणि माँ साहेब जिजाऊ यांचे पाचाड ही दोन्ही ठिकाणे आमची बांधिलकी आहेत असे आवर्जून सांगितले.



