ग्रामीण रुग्णालय महाड आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय महाड आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तोंडाचा कँसर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कँसर, स्तनाचा कँसर, आतड्याचा कँसर, किडनी व मूत्रशयाचा कँसर, व्यसनग्रस्त, पिवळे, केसरी रेशनकार्ड धारक कँसर रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महाड तालुक्यात सलग पाच दिवस मोफत उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला आमदार भरतशेठ गोगावले, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, डॉ. भास्कर जागताप, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी नगराधक्षा स्नेहल जगताप, डॉ. नितीन बावडेकर, डॉ. किरण पाटील, डॉ. गौरी राठोड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.



