जिल्हा

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे 150 रुपयाचे बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार

 

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

सन 2022 – 23 हंगामात गळितास आलेल्या उसाला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे दीडशे रुपयाचे अंतिम बिल 1 सप्टेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे शंभूराजे मोरे शिवाजीराव पाटील तसेच प्रमोद कुठे दत्ता सुर्वे संतोष पाटील आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले की आजपर्यंत कारखान्याच्या पिंपळनेर युनिट एक व युनिट दोन मधील मागील हंगामात गाळप झालेले 23 लाख 91 हजार मॅट्रिक टन उसाला 2550 रुपये प्रति टन दर दिलेला आहे व आता 1 सप्टेंबर रोजी दीडशे रुपये अंतिम बिल देण्यात येत आहे. कारखान्याचे एफआरपी रक्कम 2650 आहे मागील हंगाम अखेरच्या महिन्यात 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत गळीतास आलेल्या उसाला 75 रुपये प्रति टन जादा दर तर एक मार्चपासून हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाला प्रति टन 150 जादा दर दिलेला आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 2750 ते 2850 रुपये प्रति टन दर मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!