शहर

रोहिदास तरुण विकास मंडळाकडून 10 आणि नितेश गोळे यांनी 10 विद्यार्थी घेतले दत्तक

नितेश गोळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्याकडून स्नेहज्योति आदिवासी अंध विद्यालय येथील अंध मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड: स्वातंत्र्यदिनाचे औचित्या साधून रोहिदास तरुण विकास मंडळाकडून शाळेचे १० विद्यार्थी दत्तक घेण्यात आले, नितेश नारायण गोळे यांच्याकडून देखील शाळेचे १० विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. त्यावेळी त्यांचे सहकारी प्रतिक दीपक सर्कले, अनिकेत कदम, अविनाश पोटसुरे हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाडवी, मुख्याध्यापिका शालिनी म्हामुणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

नितेश नारायण गोळे यांनी त्यांच्या सपत्नीक वराडी येथील स्नेहज्योति आदिवासी अंध विद्यालय येथे जाऊन तेथील अंध मुलांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू भेट देऊन समाजाला एक चांगला संदेश दिला आहे.

या वेळी रोहिदास तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष विशाल महाडिक, सेक्रेटरी स्वप्नील गोरेगावकर, सल्लागार राजेंद्र बिरवाडकर, कार्याध्यक्ष नवीन परमार, खजिनदार परेश वाळंज, सदस्य चैतन्य गंभीरे, माजी नगरसेवक प्रमोद महाडिक माजी उपाध्यक्ष प्रवीण चांदोरकर, अर्बन बँकेचे संचालक उदय बहुलेकर पोस्ट ऑफिसचे सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर योगेश भोईर, अनिकेत कदम, नितेश गोळे, अविनाश पोटसुरे, अंकुर लाड, संजोग म्हशीलकर आदी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!