महाराष्ट्र

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने ठाणे विधानसभा मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रा संपन्न 

 

अभिजीत ढाणिपकर – उपसंपादक कोकण विभाग

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने ठाणे विधानसभा मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी होत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला.

या प्रसंगी ठाणे शहरात ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो उभारून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यासोबतच या यात्रेत ठाणे शहरातील शिवसेना व भाजपाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महिला भगिनी एवढच नव्हे तर लहान मुले देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली होती. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्यात आले ते या सगळ्यांना मान्य नव्हतं हे त्यांचे चेहरे सांगत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, बलिदान, समर्पण, देशप्रेम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही गौरव यात्रा काढली असल्याचे यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व त्यांचे विचार हे प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्तीसाठी शिरसावंद्य असून त्यांचा अपमान खपवून घेणार नाही असे यावेळी बोलताना ठणकावून सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला माफीवीर असा उल्लेख चीड आणणारा असून तीच चीड आजच्या सावरकर गौरव यात्रेत उमटलेली पाहायला मिळाली असल्याचे याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

ज्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांना अपमानित करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले, त्यांचेच पुत्र आणि नातू त्यांना वारंवार अपमानित करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ही शोकांतिका असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच ज्या राहुल गांधींनी सावरकरांना अपमानित केले त्यांचा धिक्कार करत असल्याचे यावेळी निक्षून त्यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटीका सौ.मीनाक्षी शिंदे, भाजपाचे महाराष्ट्र राज्य सचिव संदीप लेले, भाजपा महिला मोर्चा ठाणे शहर मृणाल पेंडसे, शिवसेना आणि भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!