जिल्हा

विक्रोळी पूर्व येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

अभिजीत ढाणिपकर – उपसंपादक कोकण विभाग

विक्रोळी पूर्व येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नागरिकांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी त्याचे मनोगत मांडले.

विक्रोळी शहरातील हे पहिलेच जनसंपर्क कार्यालय असून हे कार्यालय न्यायमंदिर बनून लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करेल अशी अपेक्षा यासमयी बोलताना त्यांनी व्यक्त केली. विक्रोळी विभागात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याची येथील रहिवाशांची मागणी दीर्घकाळ प्रलंबित आहे. या मागणीबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच इथे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येईल अशी ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बोलण्यातून दिली.

राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी साडेसहा हजार कोटींची तरतूद केली असून पावसाळ्यापूर्वी यातील काही रस्ते पूर्ण केले जातील. याशिवाय बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना १४७ प्रकारच्या चाचण्या आणि उपचार विनामूल्य करणे शक्य झाले आहे असेही याप्रसंगी त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, मा. आमदार अशोक पाटील, शिवसेना प्रवक्ते कृष्णा हेगडे, अनिल पांगारे तसेच शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व विक्रोळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!