तालुका
मौजे आडनाळे येथील गौळवाडी येथील विकासकामांचे भुमीपूजन व उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते

सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
तळा तालुक्यातील मौजे आडनाळे येथील गौळवाडी परिसरातील विविध विकासकामांचे भुमीपूजन व उद्घाटन आज करण्यात आले. गौळवाडी – आडनाळे रस्त्याचे भुमीपूजन, गौळवाडी स्मशान भुमीचे भुमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे आणि गौळवाडी अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन स्थानिक महिला ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जि.प. सभापती गिता जाधव, पं.स. सभापती अक्षरा कदम, तालुकाध्यक्ष नाना भौड, चंद्रकांत राऊत, तुकाराम खेडेकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. उत्तम जाधव, वाघमारे, लासे मॅडम, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, किशोर शिंदे, जान्हवी शिंदे, निना खेडेकर, दामोदर काते आदी उपस्थित होते.




