शहर

गुन्हे रोखण्यासाठी सीसटीव्ही उपयुक्त – अशोक दुधे

एमएमएसीईटीने मुख्य रस्त्यावर बसविले चौदा कॅमेरे

सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड उत्पादक संघटना आणि सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ( एम.एम.ए.सी.ई.टीपी ) माध्यमातून महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर नांगलवाडी फाटा ते जेबीएल सर्कल दरम्यान चौदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, या कॅमेऱ्यांचे लोकार्पण रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले, गुन्हे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरतील असा विश्‍वास दुधे यांनी या वेळेस बोलताना व्यक्त केला.

औद्योगिक वसाहतीमधील कांबळे फाटा येथे या कॅमेऱ्यांचे लोकापर्ण करण्यात आले, यावेळेस ( एम.एम.ए.सी.ई.टीपी ) चेअरमन संभाजी पाठारे, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आंधळे, सीईटीपीचे महाव्यवस्यापक जयदीप काळे, निखिल भोसले, एम.एम.ए.सी.ई.टीपी पदाधिकारी उपस्थित होते,  लोकार्पण झाल्यानंतर सीईटीपीमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळेस बोलताना सी.ई.टीपी चे चेअरमन संभाजी पाठारे यांनी साडेनऊ लाख रूपये खर्च करून हे कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती दिली, हे कॅमेरे हाय फ्रिक्वेंसीचे असून वाहनांचे नंबर्स देखील त्याद्वारे अचूक टिपता येतात असे त्यांनी सांगितले, या कॅमेऱ्यांमुळे या मार्गावर होणारे अपघात, चोऱ्या त्याचप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्या टँकर्सवर लक्ष ठेवणे सोपे जाईल असे त्यांनी सांगितले.

गुन्हे रोखण्यासाठी त्याचप्रमाणे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे सि.सि.टीव्ही उपयुक्त ठरतील असा विश्‍वास पोलीस अधिक्षक्षक अशोक दुधे यांनी या वेळेस बोलताना व्यक्त केली. अन्य ठिकाणी देखील असे कॅमेर बसविण्यात यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना रायगड पोलिसांचे नेहमीच सहकार्य राहील त्याचप्रमाणे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून पोलीस सदैव सतर्क राहतील असा विश्‍वास देखील त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!