महाराष्ट्र

दूर्गराज रायगडवर 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची जय्यत तयारी

येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खास लक्ष देण्यात आले

 

राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहन तळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोड च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने युवराज संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे.

शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.

गडावर व पायथ्याशी ३५ ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह ४ ठिकाणी आर ओ वॉटर सुविधाउपलब्ध.

गडाच्या पायथ्याला,पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केलेली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी केली जाणार. मात्र येथून शिवप्रेमींना ये–जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत.

गडावर हॅलोजन व इतर वीजपुरवठा सेवा सज्ज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने आवश्यक ती तयारीकेली आहे.

रायगडावर ये–जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

यंदाच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात  धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची तसेच जागर शिवशाहिरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा‘ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा‘ हे कार्यक्रम आकर्षण ठरणार आहेत.

राजसदरेवर होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी मेघडंबरी समोर शिवप्रमींना बसण्यासाठी व हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या मंडपाची सोय करण्यात आली आहे.

महसूल,पोलीस,सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती,  विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!