ब्रेकिंग

बिरवाडी ढालकाठी येथे धक्कादायक घटना | महिलेने आपल्या सहा मुलांना फेकले विहरीत

 

स्वप्नील ढवण – उपसंपादक

रायगड: महाड तालुक्यातील बिरवाडी ढालकाठी मधील बोरगाव येथे एका महिलेने पोटच्या पोरांना विहीरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली, विहीरीतून सहा मुलांचे मृतदेह मिळाल्याने नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली, पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे, घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी घटनास्थळी घटनस्थळी धाव घेतली, संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.


महिलेचे नाव रुना सहानी वय वर्ष 30 तर पतीचे नाव चिखुरी साहनी वय वर्ष 32, व्यवसाय मेस्त्री काम, मुळ रहिवाशी करमैय्या, करिमनगर तर्फ पियरगंज गोरखापुर उत्तर प्रदेश, तर रोशनी साहनी वय वर्ष 10, करिश्मा साहनी वय वर्ष 08, रेशमा साहनी वय 06, विद्या साहनी वय वर्ष 05, राधा साहनी वय वर्ष 1.5, शिवराज साहनी वय वर्ष 03 अशी विहीरीतून काढण्यात आलेल्या  मुलांची नावे आहेत.

मात्र या घटनेतील महिलेने हे कृत्य का केले यासंदर्भात कोणताही खुलासा अजून झालेला नाही, याबाबतीत पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!