पालकमंत्री आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा
सुयोग जाधव – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड
राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा शुक्रवार दि.01 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय निवासस्थान सुनिती येथून शासकीय वाहनाने भाऊचा धक्क्याकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. भाऊचा धक्का येथे आगमन व रो–रोजलसेवेने मांडवा, ता. अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.05 वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व शासकीय वाहनाने झिराडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. झिराड येथे आगमन व ग्रामीण प्रगती फाऊंडेशन आणि एम.कॉर्प यांच्या सहकार्याने झिराड गावात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस उपस्थिती. स्थळ : झिराड प्राथमिक विद्यामंदिर, रायगड जिल्हा परिषद. सकाळी 10.00 वा. झिराडयेथून शासकीय वाहनाने कर्जतकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. कर्जत येथे आगमन व रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभागामार्फत आयोजित आदर्श शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : शेळके हॉल, किरवली, ता.कर्जत. सोईनुसार कर्जत येथून सुतारवाडीकडे प्रयाण, सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.



