जिल्हा

रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात भारत भर जागरुकता व संपर्क अभियानाचे आयोजन

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्याकडील निर्देशाप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त दि. 2 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत संपूर्ण भारतात “भारतभर जागरुकता व संपर्क अभियाना”(India Awareness & Outreach)चे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग व सर्व तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्ह्यातील सर्व वकील संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  जिल्ह्यामध्ये मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरणयांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध विधी विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी म्हणजे दि. 02 ऑक्टोबर 2021 रोजी प्रत्येक न्यायालयामध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जनजागरुकता अभियानाची प्रभात फेरी काढून करण्यात येणार आहे. तसेच याकार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती, गावांमध्ये तसेच सर्व पोस्ट कार्यालय व पोलिस ठाण्यांमध्ये मोफत विधी सेवा व तीकोणाला मिळू शकते असे या आरोपीचे हक्क या विषयाची माहिती देणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.  तसेच विविध कायदेविषयक शिबिराचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री. संदिप स्वामी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड–अलिबाग श्रीमती विभा इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!