जिल्हा

जालना येथे 23 रुग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा संपन्न

रुग्णवाहिकांचे लोकार्पण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते संपन्न

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना यापूर्वी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन, आता नव्याने 23 अशा एकुण 43 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.

102 क्रमांकाची रुग्णवाहिका म्हणून यांचा उपयोग करण्यात येणार असून गरोदर मातांना प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात मोफत सेवा देण्यातयेणार आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना माननीय श्री. राजेश टोपे, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी उपाध्यक्ष सतीष टोपे, कल्याण सपाटे, रघुनाथ तौर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!