वाळण कोंडी येथे युवासेना अधिकारी विकास गोगावले यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
देवस्थान पत्राशेड, रस्ता कॉंक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून होणार विकास कामे
स्वप्नील ढवण – उपसंपादक
सुप्रसिद्ध नवसाला पावणारी देवी म्हणजे महाड तालुक्यातील वाळण कुंड म्हणून प्रसिद्ध असलेली वरदायिनी माता मंदिराच्या ठिकाणी पत्रा शेड पुलावरील रस्ता कॉंक्रिटीकरण त्याच प्रमाणे परिसरातील सुशोभीकरण इत्यादी कामांचे आज युवा सेना अधिकारी श्री. विकासशेठ गोगावले यांच्या हस्ते भुमिपुजण करण्यात आले, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून ही विकास कामे पूर्ण केली जातील.

आज दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन झाले, असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, पंचायत समिती सदस्या दीपिका शेलार, विभाग प्रमुख भगवान पवार, कृषी बाजार समिती संजय शिंदे, युवा सेना चिटणीस शेखर राखाडे, युवा सेना अधिकारी अमर जंगम, युवा अधिकारी राकेश घाग, सयाजी जाधव आणि लौकिक शिंदे इत्यादी उपस्थित होते. यावेळी युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले.




