जिल्हा

शुभ वास्तू ग्रुप यांच्या भैरव हिल्स मधील प्लॉट विक्री शुभारंभ ऍडव्होकेट श्री. हेमंत ससाणे यांच्या शुभहस्ते

 

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

भैरव हिल्स खोपोली – पाली महामार्ग जवळ भैरव गावालगत निसर्गरम्य परिसरात शुभ वास्तू ग्रुप यांनी नवरात्र उत्सव मुहुर्तावर दिनांक 10 ऑगस्ट रोजी भैरव हिल्स मधील प्लॉट विक्री शुभारंभ ऍडव्होकेट श्री. हेमंत ससाणे साहेब यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री काकडे साहेब यांची उपस्थिती लाभली, या शुभ प्रसंगी शुभ वास्तू ग्रुप प्रमुख सौ. प्रतीक्षा अजित धेंडे आणि श्री अजित धेंडे यांनी लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, मागील दीड दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीच्या काळात मुंबई आणि पुण्यात नोकरी व्यवसायानिमित्त राहणाऱ्या सर्वांना आपले गाव खूपच लांब असल्याने आणि आवश्यक  सुविधा उपलब्ध मिळत नसल्यामुळे मुंबई पासून किमान शंभर कि.मी. जवळपास सेकंड होम असावे अशी गरज वाटू लागली, किमान शनिवार किंवा रविवार विकेंड करिता तरी प्रदूर्षण विरहित वातावरणात सेकंड होम असावे असे वाटू लागले, अश्या निसर्गप्रेमी लोकांसाठी भैरव हिल्स हा NA प्लॉट प्रोजेक्ट, रस्ते, बगीचा, लहान मुलांना खेळणयासाठी उत्तम झोका, गसरगुंडी, मोठ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक क्लब हाउस अगदी स्विमिंगपूल अश्या कितीतरी गोष्टी युक्त प्रोजेक्ट मध्ये तयार केलेले आहेत.

शेतीची आवड असणाऱ्या 10 – 20 गुंट्यांचे प्लॉट पाणी वीज इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे,

भैरव हिल्स जवळच अंबा नदी वाहत आहे, Dam काही अंतरावर आहे, प्रोजेक्ट उंचावर असल्यामुळे सुरक्षित आहे, येथे पाणी भरण्याची कोणतीही शक्यता नाही. पाली गावातील प्रसिद्ध मंदिर केवळ दहा पंधरा मिनिटावर आहे, कामासाठी आवश्यक मजूर व्यवस्था जवळच्या गावातून मिळते त्यामुळे तेथील लोकांना रोजगार सहज उपलब्ध झाले आहेत.

भैरव हिल्स प्रोजेक्ट कलेक्टर मंजूर प्लॅन असून प्लॅन मध्ये दाखवलेली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असून प्रोजेक्ट वर CCTV कॅमेरा सहित 24 तास सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेल्या आहेत, जेष्ठ नागरिकांना येथे वावरत असतात कोणताही त्रास होणारनाही याची काळजी येथील कर्मचारी वर्ग घेत असतात, प्रोजेक्ट च्या चार ही बाजूने कुंपण युक्त असून डोंगरावरील हिरव्यागच्च झाडीतमोरंचे ओरडणे, पक्षाचं वावर अनुभवत जीवन कसे निरोगी जगावे याकरिता एक उत्तम निवारा निसर्गाच्या कुशीत घर आसवे सुंदर  सुविधाही असव्या रोजच्या वापरात असणाऱ्या शहरी म्हणजेच ग्रामीण आणि शहरी असा सुवर्ण मध्य असणारे भैरव हिल्स प्रोजेक्ट एकमेव उत्तम ठिकाण आहे, अश्या या प्रोजेक्टला अवश्य भेट द्यावी आणि प्लॉट घेऊन ठेवावा कारण नैना प्रोजेक्ट नुसार खोपोली पाली रोडजवळील भागात जागा घेणे भविष्याच्या दृष्टीने अतिशय लाभधारक ठरणार आहे, असे शुभवास्तु ग्रुपचे प्रमुख श्री अजित धेंडे सरांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!