अस्टेक लाईफ सायन्सेस मध्ये 52 व्या सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
महाड : भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून देखील साजरा केला जातो. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा दिवस साजरा करण्यामागचे हे प्रमुख उद्देश आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना आज देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. काम करताना घ्यावयाची काळजी, मोठ्या औद्योगिक ठिकाणी काम करताना टाळावयाच्या गोष्टी, तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं लागतं यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी अस्टेक लाईफसायन्सेस या कंपनी मध्ये 52 व्या राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला.
सुरक्षा ध्वज व सुरक्षा शपथ देखील घेण्यात आली, प्रथमेश मिठबावकर व आभूषण मिठागरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ऋषिकेश भोज यांनी कर्मचारी यांना सुरक्षा शपथ दिली, तात्यासो नागणे सुरक्षेचे महत्व तर सुरक्षेचे ब्रीदवाक्य हमारा लक्ष शून्य हानी याचे महत्व कंपनीचे GM किशोर पवार यांनी कर्मचारी वर्गाला पटवून दिले, कंपनी मध्ये काम करत असताना सुरक्षा व धोके त्यापूर्वीची उपाययोजना कशी करायची याची माहिती पंकज साटम यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ शेटे यांनी केले, संपूर्ण सप्ताहामध्ये विविध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याचे विश्लेषण व आभार प्रदर्शन अमोल सादळे यांनी केले.
सुरक्षा विभाग प्रमुख सुभाष गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सुनील फडतरे, शशांक मिनासे, आनंद राहतेकर, अभिजित थरवल, अनंत कुमार मूळे, योगेश मालखरे तसेच सर्व डिपार्टमेंट प्रमुख, कर्मचारी बंधू व भगिनी उपस्थित होते.



