राजकिय

रेपोली बौद्धवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत आमदार भरतशेठ गोगावले उपस्थितीत जाहीर प्रवेश

सचिन चांदोरकर - तालुका प्रतिनिधी महाड 

 

माणगाव : तालुका माणगाव लोणेरे विभागातील रेपोली बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अनेक वर्ष राष्ट्रवादी सोबत राहुन कोणत्याही प्रकारची विकास कामे न झाल्यामुळे आणि कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले मतदारसंघात करत असलेले विकास काम पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेश कर्त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

प्रवेश कर्त्यांचे आमदार गोगावले यांनी भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले, आपल्याला शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक देण्यात येईल कोणत्याही प्रकारचे अडचण भासल्यास ही समोरील सर्व मंडळी आपल्या अडचणीस धावून येतील असे प्रवेश कर्त्यांना अभिवचन देत आपली सर्व उर्वरित विकास कामे आम्ही लवकरच पूर्ण करू असा विश्वास दिला.

प्रवेश कर्ते- दिलीप बाबू मोरे, चिंतामण गायकवाड, प्रवीण मोरे, अध्यक्ष चंद्रसेन गणू मोरे, उपाध्यक्ष गौतम पवार, राजेंद्र मोरे, सुधीर मोरे, रोहिदास मोरे, आदित्य मोरे, रोहन मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे, प्रवीण मोरे, वनिता मोरे, संगीता मोरे, दिपाली मोरे, स्मिता मोरे, प्रणाली मोरे, कृष्णा मोरे, शर्मिला मोरे, तनुजा मोरे, गणेश मोरे, सरिता मोरे, तसेच यांच्या समवेत असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी आणि पुरुषांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या वेळी उपस्थित रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, युवा सेना सरचिटणीस वैभव, पधादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!