शालिनी चव्हाण गेले 56 वर्षांपासून स्वतंत्र्यांसैनिकांची पेन्शन मिळावी म्हणून लढा देतायत
सरकारी यंत्रणा खरच इतकी षंड आहे ?
सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शालिनी चव्हाण गेले 1 ते 2 वर्ष नव्हे तर 56 वर्षांपासून आपल्या हक्काच्या पेन्शन साठी लढादेत आहेत, हा लढा देत देत आजींची नव्वदी पार झाली आहेत, आजींना आता बोलता येत नाही, शरीर अंथरूनला खिळून आहे, त्यांचे पती लक्ष्मण चव्हाण हे स्वातंत्र्यसैनिक होते, 1965 साली त्यांचा मृत्यू झाला, आपल्या स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या दिवंगत पतीचे पेन्शन आपल्याला मिळावी म्हणून हा लढा 56 वर्षापासून चालू आहे.
आजीनंकडे काही जुने कागदपत्र आहेत, त्यामध्ये 1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केलेला दिसून येत आहे, कित्येक राजकारणी अधिकारी फक्त खोटी आश्वासन देऊन निघून गेली, या वर्षी येईल पुढच्या वर्षी येईल असे सांगून जातात पण 56 वर्ष झाली पेन्शन काही अजून पर्यंत मिळालं नाही.
स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी म्हणून शालिनी चव्हाण यांना दरवर्षी महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिनच्या वेळेस पत्र येत आहे, पण पेन्शन काही अजून मिळाले नाही, त्यामुळे प्रश्न असा पडतो की स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी म्हणून गौरव होते, पण पेन्शन काही सरकार देत नाही, देशासाठी मरून काय मिळाला मला असा प्रश्न नातेवाईक आता सरकारला करत आहेत, बबलू मोरे आणि पराग बामणे हे दोन व्यक्तीया कुटुंबा सोबत आहेत व तसेच पेन्शन मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत, आता प्रशासणला इतकेच आव्हान आहे, आता तरी याआजींना त्यांच्या हक्काचं पेन्शन मिळावं व 56 वर्ष पेन्शन साठी दिलेला लढा पेन्शन मिळून सार्थकी झाला याचं समाधान आयुष्यच्या अखेरच्या टप्यात मिळूदे.



