शहर
आदिवासी महिला व जागृती बचत गट शेल यांनी तयार केले दिवाळी निमित्त नवनवीन साहित्य
जीवन विकास केंद्र नडगाव यांच्या सर्वेसर्वा रेखा सिस्टर यांच्या नवीन उपक्रमाला भेट देऊन तयार केलेल्या रंगीबेरंगी पणत्याची पाहणी आमदार भरतशेठ गोगावले केली

स्वप्नील ढवण – उपसंपादक
जीवन विकास केंद्र नडगाव यांच्या सर्वेसर्वा रेखा सिस्टर यांच्या अध्यक्षते खाली शेल येथील आदिवासी महिला व जागृती बचत गटयांना दिवाळी उत्सवा निमित्त नव नवीन पणत्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, या उपक्रमातून दिवाळी साठी मेणाच्या आणिमेणाच्या रंगीबेरंगी पणत्या बनविण्यात आल्या, खूप सुंदर व आकर्षित अश्या पणत्या या ग्रुप ने बनविल्या.

बनविलेल्या रंगीबेरंगी पणत्यांची पहिली भेट म्हणून माणगाव– महाड – पोलादपूरचे माननीय आमदार श्री. भरतशेठ गोगावले आणीराजिप सदस्य मनोज काळीजकर साहेब यांना देण्यात आल्या, सर्व बनविलेल्या साहित्यांची पाहणी स्वतः आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली, व शेल येथील आदिवासी महिला व बचत गट यांना प्रोत्साहन केले आणि पुढे असेच नवनवीन उपक्रम करावे त्यासाठी शुभेच्या दिल्या.




