तालुका

पोस्को स्टील कंपनीच्या CSR निधीतून शाळा दुरुस्तीसह विविध उपक्रमांचे लोकार्पण; शाळा व्यवस्थापन समितीकडून आभार

 

माणगाव प्रतिनिधी – नितीन बडे

निजामपूर : सामाजिक दायित्वाच्या (CSR) माध्यमातून शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने, पोस्को स्टील कंपनीच्या वतीने स्थानिक प्राथमिक शाळेमध्ये विविध विकासकामे आणि उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आले. यामध्ये शालेय इमारतीची दुरुस्ती, आकर्षक रंगरंगोटी, मुलांसाठी अद्ययावत शौचालयाचे बांधकाम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊ वाटप यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमांमुळे शाळेचा कायापालट झाला असून विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रसन्न आणि सोयीस्कर शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीने दाखवलेल्या या औदार्याबद्दल शाळा प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोस्को स्टील कंपनीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून राजू गाडुते – सिनिअर जनरल मॅनेजर, महेंद्र तट्टे – जनरल मॅनेजर, कुलदीप पुरंदरे – मॅनेजर, स्वप्निल पाटिल – डेप्युटी मॅनेजर, आसावरी काळे – एक्झिक्युटिव्ह, संजय अनंत पालांडे (निजामपूर बीट विस्तार अधिकारी) आणि महादेव बांगर (केंद्रप्रमुख, निजामपूर) यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी कविता रवी वालेकर (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), दत्तात्रय पवार (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती), नम्रता नितीन बडे (मुख्याध्यापिका), प्रतीक्षा प्रताप होवाळ (उपशिक्षिका),चंद्रा दत्तात्रय पवार (अंगणवाडी ताई), शुभांगी श्रीराम शिंदे (स्वयंपाकी ताई) आणि मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते.

पोस्को स्टील कंपनीने सामाजिक भान जपत शाळेसाठी केलेली ही मदत अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा तर मिळाल्याच आहेत, शिवाय त्यांच्यात शिक्षणाविषयी नवा उत्साह निर्माण झाला आहे. — शाळा प्रशासन व व्यवस्थापन समिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!